कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

उरण दि ९(विठ्ठल ममताबादे ) : लेट निशांत इलेव्हन क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित निशांत चषक २०२३ या क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न सोहळा रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता उरण तालुक्यातील दादरपाडा गावात रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्याहस्ते करण्यात आले .

हा दिमाखदार उदघाट्न सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सद्स्य तथा माजी जिल्हा परिषद सद्स्य डॉ. मनिष पाटील, जिल्हा सरचिटणीस रामनाथ पंडित, जिल्हा चिटणीस महेंद्र मुंबईकर, मुरलीधर ठाकूर, एनएसयुआयचे उरण तालुका अध्यक्ष आदित्य घरत,उरण तालुका इंटकचे उपाध्यक्ष राजेश ठाकूर,अंगत ठाकूर व मोठया संख्येने क्रिकेट रसिक उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE