डॉ. प्रीतम म्हात्रे यांच्या जन्मदिनी शाळांना स्मार्ट टीव्ही संचवाटप

पंतप्रधानमंत्री जन आरोग्य योजना कॅम्पचेही आयोजन

उरण (विठ्ठल ममताबादे ) : आपल्या जन्मदिनाचं औचित्य साधत अनेक समाजपयोगी कार्यांची विकासगंगा जनसामान्यांपर्यंत कशी पोहचवता येईल हे ध्येय उराशी बाळगून या कठीण काळात गरीब-गरजवंताकरिता सदैव मदतीचा हात पुढे करणारी व्यक्तीमत्व ही कुठलीही वेळ काळ न पाहता आपल्या परीने जे काही चांगलं करता येईल ते करत त्या गरजूवंतासाठी एक आशेचा किरण बनत असतात ! अश्याच सेवाभावी व्यक्तिमत्वाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं औचित्य साधत केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्था वेश्वीचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून उरण जांभूळपाडा व करंजा कोंढरीचापाडा या जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट टीव्ही संच वाटप आणि वेश्वी उरण येथील पी.पी. मुंबईकर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे वेश्वी ग्रामपंचायत मधील नागरिकांना पंतप्रधान जन आरोग्य योजने मार्फत स्मार्ट कार्ड काढून देणे शिबिराचे आयोजन करण्यात आले.

त्याचबरोबर जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांकरिता संगिताताई ढेरे यांच्या माध्यमातून खास डाबर या नामांकित कंपनीचे एनर्जी ड्रिंक्स,डाबर विटा हेल्थी चॉकलेट या ड्रिंक्सच्या पकिटांच्या वाटप कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आले ! पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितमदादा म्हात्रे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ह्या अनोख्या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळांना स्मार्ट टी. व्हि.संच भेंट म्हणून देण्यात आल्या त्यामुळे त्या शाळांतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शालेय कवितांचे वाचन, प्राणी,पक्षी या बद्दलची माहिती आणि अनेक प्रकारच्या माहितीची देवाण – घेवाण होईल एवढं मात्र नक्की !. त्याचबरोबर त्या शालेय विद्यार्थ्यांना मिळालेल्या एनर्जी ड्रिंक्समुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगा होता.

पी. पी. मुंबईकर इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्रिन्सिपल प्रितमजी टकले, सर्व शिक्षक वर्ग, वेश्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते, अनेक मान्यवर विद्यार्थी वर्ग आणि करंजा कोंढरीचापाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका समता, सर्व शिक्षक वर्ग,विद्यार्थी वर्ग,जांभूळपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी,चीर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य राजू पाटील, अनिल घरत-उरण तालुका सचिव आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था, अजिंक्य पाटील उपाध्यक्ष – केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था, रोशनीताई मोहिते ग्रामपंचायत सदस्या चिर्ले, प्राजक्ताताई गोंधळी ग्रा. पं. सदस्या चिर्ले या सर्वांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE