शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गोवठणे येथे मोफत आरोग्य शिबिर

उरण (विठ्ठल ममताबादे ) : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रविवार दि. 22 जानेवारी 2023 रोजी ओमसाई ग्रुप पुरस्कृत शिवसेना शाखा व युवासेना गोवठणे तसेच सुश्रशा सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने  मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात विविध आजारांवरील टेस्ट, तपासणी करण्यात आले व मोफत सल्लाहि देण्यात आला.

या शिबिरात नागरिकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला.यावेळी माजी शाखाप्रमुख  रूपेश पाटील,शिवसेना सदस्या शितल म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ता सु क म्हात्रे,अशोक म्हात्रे,अमिश म्हात्रे,किरण नथुराम म्हात्रे,सुशांत पाटील,मनोज पाटील शाखा प्रमुख  महेश पाटील शिवसेना सदस्य मनोज पाटील  आवरे ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील युवासेना प्रमुख आवरे अमित म्हात्रे,सामाजिक कार्यकर्ता – प्रणित पाटील, अविनाश म्हात्रे, केसरिनाथ पाटील, भाजपा तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, सुरज म्हात्रे, विश्रांती म्हात्रे, विद्यानद म्हात्रे,सुधाकर पाटील,अविनाश म्हात्रे, आवेश म्हात्रे सुश्रुषा हॉस्पिटल पनवेलचे  डॉ. ऋतुजा मॅडम, राकेश चाळके, सिस्टर कविता धरम, प्राजक्ता पाटील इत्यादी उपस्थित होते.एकंदरीत या आरोग्य शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE