ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ दापोलीत निघाली सायकल फेरी

सायकलपटूंनी दिली दातार वृद्धाश्रमाला भेट

दापोली : ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ दापोली सायकलिंग क्लब आणि द फर्न समाली रिसॉर्टच्या वतीने रविवार २२ जानेवारी २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. तसेच दापोलीतील गणेश दातार वृध्दाश्रमातील आजी आजोबांची भेट घेण्यात आली.

आझाद मैदानातून सुरु झालेली सायकल फेरी केळसकर नाका- बुरोंडी नाका- फॅमिली माळ- गणेश दातार वृध्दाश्रम- नटराज नाका- आझाद मैदान अशा ५ किमी मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. दातार वृध्दाश्रमामध्ये व्यवस्थापक रवींद्र इंगळे यांनी तेथील कार्याबद्दल माहिती सांगितली. यावेळेला ज्येष्ठ नागरिक संस्थेचे राजाराम मढव, सुरेश गुरव, प्रेमानंद महांकाळ आणि सहकारी उपस्थित होते. त्यांनी आजी आजोबा नातवंडे नात्याबद्दल माहिती दिली. नुकतेच विभागस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले विद्यार्थी यश शिर्के, स्नेहा भाटकर, संचिता भाटकर, सर्वेश बागकर, साईप्रसाद वराडकर, श्री खानविलकर, हर्ष लिंगावळे यांचा गौरव करण्यात आला.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात सुनिल रिसबूड, सर्वेश बागकर, संदीप भाटकर, विनय गोलांबडे, सुधीर चव्हाण, फर्न समाली रिसॉर्टचे दिनेश कुमार यादव इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. तसेच स्नेहसंध्या प्रतिष्ठानच्या शुभांगी गांधी, निलांबरी अधिकारी, स्मिता सुर्वे, रेखा बागुल आणि सहकारी यांचेही सहकार्य लाभले. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE