गणपतीपुळे मंदिरात माघी गणेशोत्सवात श्रींना सहस्त्र मोदक समर्पण

रत्नागिरी : महाराष्ट्रासह सर्वदूर पसरलेल्या लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात स्वयंभू श्री गणेशाला माघी गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी तृतीय दिनी श्रींसाठी सहस्त्र मोदक समर्पण कार्यक्रम संपन्न झाला.

माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात दरवर्षी जवळपास आठवड्यावर कार्यक्रमांचा आयोजन केले जाते. याही वर्षी दिनांक 22 ते 28 जानेवारी 2023 या कालावधीत मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यावेळी कोरोनामुक्त वातावरणामुळे बाप्पाच्या भाविकांमध्ये आनंदी आनंद आहे.

यानिमित्त मंदिरात सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये दि. २४ जानेवारी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सहस्त्र मोदक समर्पण, दि. २५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता श्रींची पालखी मिरवणूक ( प्रदक्षिणा ), दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत महाप्रसाद ( रथसप्तमी ), याचबरोबर रविवार दिनांक 22 ते गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ या कालावधीत रोज सायंकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत डोंबिवली येथील ह.भ.प. श्री. मोहक प्रदीप रायकर यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. शुक्रवार दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता ‘स्वरार्पण’ ही शास्त्रीय, अभंग व नाट्यसंगीताची मेजवानी असलेली मैफल आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये श्रीधर पाटणकर व करुणा पटवर्धन यांचे सादरीकरण होणार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE