


रत्नागिरी : येथील मिरजोळे एमआयडीसी क्षेत्रातील लायन्स आय हॉस्पिटलनजीक श्री श्री निताई सुंदर नवद्वीप चंद्र मंदिरात आज ( रविवारी) सायंकाळी भगवंतांवर श्री पंचतत्त्व अभिषेक आणि ५६ भोग तसेच प्रवचनादी कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. यावेळी उपस्थित भाविक भगवतांच्या कीर्तनात रमून गेले.
यावेळी ‘इस्कॉन’च्या मंदिरात सायंकाळी ६.३० ते ६.४५ – गौर आरती, सायंकाळी ६.४५ ते ७.३० – अभिषेक, सायंकाळी ७.३० ते रात्री ८.३० पंचतत्व लीला प्रवचन – श्री रसराज गोपाळ प्रभु, रात्री ८.३० ते ९.०० – आरती, कीर्तन, 56 भोग, तसेच रात्री ९.०० ते ९.३० यावेळेत भाविकांसाठी महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले.















