भेंडखळ ग्रामपंचायतीच्या सभा मंडपासाठी निधी मंजुर

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील भेंडखळ येथील ठाणकेश्वर मंदिराजवळ असलेल्या समाज मंदिरासाठी निधी मिळण्यासंदर्भात भेंडखळ ग्रामपंचायतीने दि. २२/१०/२०२२ रोजी ठराव करुन रायगड चे पालकमंत्री मा. उदय सामंत  यांच्याकडे दिला होता. 


बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड उपजिल्हाप्रमुख तसेच भेंडखळ गावचे माजी सरपंच अतुल भगत यांनी यासाठी पाठपुरावा करुन पालकमंत्र्याकडुन सदर कामासाठी निधी मंजुर करुन घेतला आहे लवकरच हा निधी भेंडखळ ग्रामपंचायतीकडे सुपुर्द होईल, ह्याबाबत भेंडखळ गावच्या ग्रामस्थांनी तसेच ग्रामविकास आघाडीने अतुल भगत यांचे आभार मानले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE