देवरूख (सुरेश सप्रे) : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया या भारतीय महासंघाशी संलग्न असलेली तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) राज्य संघटनेच्या कोषाध्यक्षपदी रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा यांची निवड करण्यात आली असून राज्य संघटना अध्यक्षपदी डॉ. अविनाश बारगजे (बीड) तसेच महासचिवपदी मिलिंद पठारे याची बिनविरोध निवड झाली आहे.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक अँड. राजकुमार कश्यप व निवडणून निर्णय अधिकारी विजय ढाकणे यांच्या उपस्थितीत सन २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
















