वर्ध्यातील राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या युवा तायक्वांडो क्लबची १० पदकांची कमाई

रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व वर्धा जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 32 वी महाराष्ट्र राज्य कॅडेट तायक्वांदो अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा दि. 12ते 14 फेब्रुवारी दरम्यान स्पर्धा वर्धा जिल्हयामधील पुलगाव लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येते पार पडली. या राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघात रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर नाचणे ओम साई मित्र मंडळ येतील तायक्वांडो प्रशिक्षण वर्गातील खेळाडूनी** राज्यस्तरीय स्पर्धेत ६ सुवर्ण पदके, १ रौप्य तर ३ कास्य पदके पटकावली आहेत.

राज्यस्तरावर झालेल्या या स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे :
1) सई सुवरे. सुवर्ण, 2) भार्गवी पवार. सुवर्ण,
3)योगराज पवार सुवर्ण, 4) श्रृती काळे सुवर्ण 5) तुषार पाटील सुवर्ण, 6)नूपुर दप्तरदार सुवर्ण, 7)श्रुती काळे रौप्य
8) अद्वेत सिंग कास्य, 9 ) भार्गवी पवार कास्य तर 10) योगराज पवार कास्य.

विजेते सर्व खेळाडूंना प्रशिक्षक तेजकुमार लोखंडे (2दान ब्लॅक बेल्ट कोरिया) अमित जाधव (1दान ब्लॅक बेल्ट कोरिया) महिला प्रशिक्षक सौ.शाशिरेखा कररा याचे मार्गदर्शन लाभले.


या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग घेतला होता सदर राज्य स्पर्धेत यश मिळविल्याने खेळाडूंना युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिग सेंटरचे सर्व सन्मानित पदाधिकारी व तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव श्री मिलिंद पठारे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते), रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशन कोषाध्यक्ष (शासनाचे जिल्हा संघटक पुरस्कार विजेते), श्री वेंकटेश्वरराव कररा उपाध्यक्ष शैलेशजी गायकवाड (psi), उपाध्यक्ष श्री विश्वदास लोखंडे जिल्हा महासचिव श्री लक्ष्मण कररा (5th dan ब्लॅक बेल्ट ) जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी (शासनाचे मार्गदर्शक पुरस्कार विजेते) सदस्य श्री संजयजी सुर्वे (कामगार पुरस्कार विजेते), युवा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष राम कररा (शासनाचे युवा पुरस्कार विजेते) यांनी सर्व पदक विजेते खेळाडूंना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE