प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची उद्या टिळक भवनमध्ये महत्वाची बैठक

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक उद्या बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी दादर येथील पक्ष कार्यालय टिळक भवन येथे होत आहे. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे.

या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी, प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मंत्री, आमदार व जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित राहणार आहेत.

टिळक भवन येथे होत असलेल्या या बैठकीत नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत अमरावती पदवीधर मतदारसंघातून  विजयी झालेले धीरज लिंगाडे व नागपूर शिक्षक मतदारसंघातून मोठ्या बहुमताने विजयी झालेले सुधाकर आडबाले या दोन उमेदवारांचा सत्कार केला जाणार आहे तसेच खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील भारत यात्रींचाही सत्कार केला जाणार आहे. ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाचा आढावा घेतला जाईल तसेच भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे.

 

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE