३२ वी महाराष्ट्र राज्य बालगट तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा आजपासून डेरवण येथे

रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने 32 वी महाराष्ट्र राज्य बालगट तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 16 ते 18 मार्च दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण क्रीडा संकुल सावर्डे चिपळूण जिमनॅस्टिक हॉल येथे होत आहेत.


या स्पर्धेत रत्नागिरीच्या सुरभी पाटील 16kg खालील, स्वर्णिका रसाळ 26 kg खालील, स्मीत कीर 32 kg खालील, भक्ती डोळे 35 kg खालील, आराध्य सावंत 38 kg खालील गटात खेळत आहेत. रत्नागिरीतील एस आर के तायक्वांदो क्लब मारुती मंदिर, गणराज तायक्वांदो क्लब छत्रपती नगर आणि जय भैरी तायक्वांदो क्लब यांचे हे विद्यार्थी असून त्यांना अनुक्रमे प्रशिक्षक शाहरुख शेख प्रशांत मकवाना आणि मिलिंद भागवत यांच प्रशिक्षण लाभल आहे.

रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे तसेच कोषाध्यक्ष (शासनाचे जिल्हा संघटक पुरस्कार विजेते) श्री वेंकटेश्वरराव कररा, उपाध्यक्ष.श्री विश्वदास लोखंडे, जिल्हा महासचिव लक्ष्मण कररा (5th DAN ब्लॅक बेल्ट), जिल्हा कोषाध्यक्ष शशांक घडशी(शासनाचे मार्गदर्शक पुरस्कार विजेते), सदस्य संजय सुर्वे व सर्व क्लबचे पदाधिकारी यांच्याकडून सर्व विजेत्याना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE