सावंतवाडी-मडगाव पॅसेंजरच्या फेऱ्याही उद्यापासून विद्युत इंजिनसह
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे दररोज धावणारी दिवा सावंतवाडी एक्सप्रेस दि. 2 डिसेंबर 2023 पासून डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिनवर चालवली जाणार आहे.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण होऊन या मार्गाचे लोकार्पण देखील या आधीच करण्यात आले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने या मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्या डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिनवर चालवण्यात येत आहेत. आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या आणि भारतीय रेल्वेच्या विविध झोनमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनेक गाड्या या विजेवर धावत आहेत. काही थोड्याच गाड्या आता डिझेल इंजिन जोडून चालवल्या जात आहेत.
यासंदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दिवा ते सावंतवाडी एक्सप्रेस (10105/10106) तसेच पुढे सावंतवाडी ते मडगाव (50107/50108) अशी त्याच अनेक सह चालवली जाणारी पॅसेंजर गाडी देखील दिनांक 2 डिसेंबर 2023 च्या फेरीपासून विजेवर धावणार आहे.
या मार्गावर धावताना परतीच्या प्रवासात या गाड्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 3 डिसेंबर 2023 च्या फेरीपासून विद्युत इंजिनचा चालवल्या जाणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील बहुतांश गाड्या आता विजेवर धावू लागल्यामुळे डिझेल इंजिनमुळे निर्माण होणारा धूर व त्यायोग्य होणारे प्रदूषण कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे.