रत्नागिरी / मुंबई : हिवाळी पर्यटन हंगाम तसेच क्रिसमस साठी गोव्याकडे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.
0 1453/01454 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळरु मार्गावर दिनांक 22 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष गाड्या धरणार आहेत.
014 55 /01456 या गाड्यांची जोडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील करमाळी दरम्यान 24 डिसेंबर 2023 पासून धावणार आहे.
क्रिसमससाठीची तिसरी विशेष गाडी 01155/01156 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूरू दरम्यान 26 डिसेंबर 2023 पासून चालवली जाणार आहे.
हिवाळी पर्यटन हंगाम तसेच क्रिसमसच्या सुट्टीमुळे कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी चौथी विशेष गाडी (01459/01460) हे लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोव्यातील करमाळी दरम्यान 21 डिसेंबर पासून 28 डिसेंबर 2023 पर्यंत आठवड्यातून एकदा चालवली जाणार आहे.