रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वे मार्गावर दि. १ मार्च २०२४ पासून विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्गातील आंगणेवाडी जत्रेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचे नियोजन दरवर्षी केले जाते.
आंगणेवाडी स्पेशल गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी.
यावर्षी दिनांक १ मार्च 2024 रोजी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून आंगणेवाडीसाठी 01043/01044 ही गाडी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटेल सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता ती गोव्यात करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दिनांक ३ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटेल आणि सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ रोजी पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी ती मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचेल.
हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
आंगणेवाडी जत्रेसाठी जाहीर करण्यात आलेली ही पहिली विशेष गाडी 22 डब्यांची एलएचबी डब्यांची गाडी असेल.