पालघर, वसई, पनवेल, रत्नागिरी मार्गे मंगळूरूला जाणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मागील काही महिन्यांपासून विशेष गाडी म्हणून धावणारी उधना ते मंगळूर ही गाडी आता जून 2024 च्या पहिल्या आठवड्या पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. स्पेशल फेअर म्हणजेच विशेष भाडे आकारून ही गाडी आता दि. ५ जून २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 09057 ही विशेष रेल्वे गाडी गुजरातमधील सुरतजवळील उधना जंक्शन येथून दर आठवड्यातील बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वे मार्ग मंगळुरू ला ती सायंकाळी ७ वाजता पोहोचेल.
या गाडीच्या फेऱ्या दिनांक 7 एप्रिल ते 5 जून 2024 या कालावधीत होतील.
परतीच्या प्रवासात ही गाडी (09058) मंगळुरू जंक्शन येथून आठवड्यातील दर गुरुवार आणि सोमवारी रात्री दहा वाजता निघून उधना जंक्शनला ती रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. या गाडीच्या फेऱ्या दिनांक 8 एप्रिल ते 6 जून 2024 या कालावधीत होतील.
या स्थानकांवर थांबे
आपल्या संपूर्ण प्रवासात ही विशेष गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थीवी, करमाळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कोणता मुर्डेश्वर भटकळ मूकांबिका रोड, बिंदूर, कुंदापुरा, उडपी, मुलकी, सुरतकल या स्थानकांवर थांबे घेणार आहे.