Ultimate magazine theme for WordPress.

कलाकार घडविणाऱ्या पैसा फंड इंग्लिश स्कूलचे कार्य अनुकरणीय !

0 58

माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांचे गौरवोद्गार

संगमेश्वर : कलाकार घडविणे हे सहजसोपे काम नाही . कलाकार घडविण्यासाठी गुरुला अपार मेहनत घ्यावी लागते आणि तेवढेच परिश्रम शिष्यांना देखील करावे लागतात .  गुरु उत्साही असल्यानंतर शिष्यही उत्साही होतात . संगमेश्वरच्या व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा इंग्लिश स्कूलचा कलावर्ग आणि कलादालन म्हणजे बोलल्या कलाकृतींचा खजिना आहे . येथील शांत आणि प्रसन्न वातावरणात या कलाकृती रसिकांजवळ संवाद साधतात . व्यापारी पैसा फंड संस्थेने कला विषयासाठी दिलेले स्वातंत्र्य हे नक्कीच अभिनंदनीय आहे असे गौरवोद्गार जिल्हा परिषद माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी काढले . 
पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर येथे आज संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि लिपिक यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती . या सहविचार सभे नंतर शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी पैसा फंडच्या कलावर्गा तर्फे उभारलेल्या कलादालनाची पहाणी केली . यावेळी त्यांच्या समवेत शिक्षण विभागाचे चौधरी , कलाध्यापक संघटना रत्नागिरीचे इमतियाज शेख , व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदि मान्यवर उपस्थित होते
शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी पैसा फंडच्या कलाविभागाने सुरु केलेल्या कलासाधना या उपक्रमाचे मोठे कौतूक केले . या उपक्रमातून प्रशालेकडे १२०० बाल कलाकृतींचा संग्रह झाला ही नक्कीच कौतूकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले . कलादालनातील प्रत्येक कलाकृतीच्या सावंत यांनी अत्यंत बारकाईने पहाणी करुन कलाकारांचे मनापासून कौतूक केले . कलादालनातील शिल्पे अंतर्मुख करतात असेही सावंत यांनी नमूद करुन जिल्हा परिषदेच्या कर्तव्यतत्पर मुख्य कार्यकारी इंदुराणी जाखड या कलाप्रिय असल्याने पैसा फंडच्या कलादालनाला भेट देण्यासाठी आपण आवर्जून त्यांना या उपक्रमाची माहिती देवू आणि त्यांच्या समवेत या कलादालनाला परत एकदा भेट देवू असे आश्वासन सुवर्णा सावंत यांनी दिले . पैसा फंडच्या कला विभागातर्फे संस्था सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांना प्रशालेची माजी विद्यार्थीनी चित्रकार ऐश्वर्या कोकाटे हिने रेखाटलेली एक कलाकृती भेट देण्यात आली . 

पैसा फंडच्या कला विभागातर्फे शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांना माजी विद्यार्थीनी चित्रकार ऐश्वर्या कोकाटे हिने चितारलेली कलाकृती भेट देतांना संस्था सचिव धनंजय शेट्ये सोबत चौधरी , खामकर आणि शेख . 
Leave A Reply

Your email address will not be published.