चिपळूण : पाचाड येथे कृषीभूषण तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी पालवण आणि कृषी विभाग, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने चारसुत्री भात लागवडीचे यशस्वी प्रात्यक्षिक करण्यात आले.
या उपक्रमात रोशन रविंद्र चाळके यांच्या शेतात प्रात्यक्षिक स्वरूपात चारसुत्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. यासाठी कृषीराज RAWE ग्रुप चा विशेष सहभाग होता, तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, रोपांची विशिष्ट अंतरावर लावणी आणि कीड-रोग नियंत्रण याबाबत सखोल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमास सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सुधीर अंबरे, मंडळ कृषी अधिकारी श्री. दत्तात्रय आवारे, आणि उप कृषी अधिकारी श्री. दत्तात्रय काळे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतकरी व विद्यार्थ्यांना नवतंत्राची स्पष्ट समज मिळाली.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक शिक्षणाचा भाग असून, त्यातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख करून दिली जाते. गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाने आणि कृषी विभाग, चिपळूण यांनी घेतलेला हा पुढाकार भविष्यातील कृषी उत्पादनवाढीसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले आणि प्रा. विघ्नेश सपकाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रात्यक्षिकाच्या यशस्वीतेसाठी अभय कदम, सयाजी ढोणे, आदित्य शेंडे, अमोल रामगुडे, रोहित रोंगे, आकाश जाधव, तुषार जाधव, शुभम जाधव, गणेश गायकवाड, किरण खिलारे, निरंजन दत्त बदडे व इतर नागरिक यांचा विशेष सहभाग होता.
