कोंडिवरे इंग्लिश मिडियम स्कूलचा निकाल १०० टक्के
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील दारुल उलूम इमाम अहमद रजा इंग्लिश मिडीयम स्कूल कोंडीवरे येथील मदरशाला संलग्न शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे . दहावी परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . यशस्वी विद्यार्थी आणि मार्गर्शक विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका तेहसिन मुनव्वर हुजरे तसेच मदरशाचे सचिव अन्वर खान यांनी अभिनंदन केले आहे .