https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कोकणात गणेशोत्सवासाठी वसईमार्गे धावणाऱ्या सहा विशेष गाड्या जाहीर

0 76

वसई, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवलीमार्गे निर्धारित स्टेशनपर्यंत धावणार
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा

रत्नागिरी : वसई रोडमार्गे कोकणात येणाºया गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा रेल्वेकडून गुरुवारी सायंकाळी करण्यात आली आहे. यानुसार गणेशोत्सवासाठी एकूण सहा विशेष गाड्या धावणार आहेत.

मध्य रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी या पूर्वीच विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून वसई रोडमार्गे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाºया विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.
या नुसार मुंबई सेंट्रल ते ठोकूर (09001) या साप्ताहिक विशेष गाडीच्या फेऱ्या दि.23 आॅगस्ट, 30 आॅगस्ट तसेच ६ सप्टेंबर २०२२ होणार आहेत. परतीच्या प्रवासात ही गाडी (09002) दि. 24 व 31 आॅगस्ट तसेच ७ सप्टेंबर रोजी ठोकुर ते मुंबई सेंट्रल मार्गावर धावणार आहे.
त्याचबरोबर मुंबई सेंट्रल ते मडगाव दरम्यान धावणारी साप्ताहिक स्पेशल फेअरची गाडी (09003/09004) दिनांक 24 आॅगस्टपासून 11 सप्टेंबर पर्यंत आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.
09011 /9012 या क्रमांकाने धावणारी गाडी बांद्रा ते कुडाळ दरम्यान चालवण्यात येणार आहे. ही विशेष वाडी दिनांक २५ आॅगस्टपासून साप्ताहिक पद्धतीने चालवण्यात येणार आहे.
(०९०१८/०९०१७) ही गाडी सुरतजवळील उधना स्थानकापासून मडगावपर्यंत चालवण्यात येणार आहे. गणपतीसाठी साप्ताहिक पद्धतीने चालवण्यात येणारी ही गाडी २६ आॅगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत धावणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर वसई रोडमार्गे धावणारी सहावी विशेष गाडी (०९१५० /०९१४९) विश्वामित्री (गुजरात) ते कुडाळ दरम्यान दि. २९ आॅगस्ट ते ६ सप्टेंबर २०२२ आठवड्यातून एकदा धावणार आहे.
वसईमार्गे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाºया या सर्व गाड्यांचे आरक्षण दिनांक १८ जुलै २०२२ पासून रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्या तसेच आयआरसीटीसी या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.