जासई हायस्कूलमध्ये मोफत वह्यावाटप कार्यक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : सामाजिक ,शैक्षणिक ,कला, क्रीडा,संस्कृती आणि आरोग्य क्षेत्रात गेली अनेक वर्ष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील जुनिअर कॉलेज, जासई येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेश पाटील ,कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण जगे आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते हा वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब हे एक दानशूर व्यक्तिमत्व असून त्यांनी रयत शिक्षण संस्थेला व या हायस्कूलला अनेक वेळा मोठी मदत केली आहे.असे मनोगत व्यक्त करत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाविषयी सुरेश पाटील यांनी आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली. विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे यांनीही श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे आभार मानले .विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत या विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्याबद्दल मंडळाचे आभार व्यक्त केले.तसेच जासई गावचे शिक्षण प्रेमी ग्रामस्थ सुनील घरत यांनीही आपल्या मनोगता मधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी मधुकर पाटील, गोपीनाथ म्हात्रे, योगिता म्हात्रे अरुणाताई घरत,घरत टी. टी.मॅडम,अमृत ठाकूर तसेच विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन मयुरा ठाकूर यांनी केल