उरण दि. ७ (विठ्ठल ममताबादे ) : दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी डॉ. ए. पी .जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनने डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या 92 वी जयंतीच्या निमित्ताने ‘टेकएक्सलेरेट परिषद 2023 एसटीईएम (स्टेम) आणि रोबोटिक्स’ स्पर्धेचे परभणी येथे आयोजन केले होते.
शिवाजी इंजिनिअरिंग कॅम्पस परभणी येथे महाराष्ट्रासह सात राज्यातील 153 माॅडेल्स व हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. उपस्थित कलाम फाऊंडेशन पदाधिकारी व मान्यवरांनी जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा मोठीजुईचा विद्यार्थी ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच सहभाग घेऊन रोबोटिक्स साहित्यातून रोबो ॲम्बुलन्स हा प्रोजेक्ट उत्तम प्रकारे सादर करून आपले इनोवेशन व रोबोटिक्स कौशल्य सादर करून परिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तम प्रतिसाद दिला. त्याबद्दल या फाउंडेशनच्या सदस्या गौरी देशपांडे मुंबई व प्रख्यात रोबोटिक तज्ञ माननीय विशाल लिचडे सर नागपूर,संदीप वारगे कोकण विभाग समन्वयक व अन्य मान्यवरांनी कुमार लक्ष महेश धाके इ.सातवी याचे भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद शाळा देखील सहभागी आहेत हे पाहून मान्यवरांनी देखील शालेय प्रशासन व पालकांचे विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले .
या स्पर्धेत प्रोजेक्टसाठी विशेष मेहनत घेऊन सक्रिय सहभाग घेणारे या शाळेचे मुख्याध्यापक संजय होळकर,यतीन म्हात्रे ,व सर्व शिक्षकवृंद मोठीजुई, शाळा व्यवस्थापन समिती,पालक यांचेदेखील रायगड जिल्ह्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग अलिबाग,गटशिक्षणाधिकारी कार्यालय उरण,केंद्रप्रमुख चिरनेर व सर्व शिक्षक वृंद ,पालक यांजकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
