कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेचा या वर्षातील १५ वा पगारवाढीचा करार ; ओल्ड मर्स्क कामगारांना ८००० रुपये पगारवाढ !
उरण (विठ्ठल ममताबादे ) : कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटना ही कामगारांना न्याय देणारी रायगड व नवी मुंबई मधील एकमेव संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून सन २०२३ या वर्षातील १५ वा पगारवाढीचा करार शनिवारी शेलघर येथील कार्यालयात करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना तीन वर्षांसाठी ८००० रुपये पगारवाढ, दोन रजा वाढ, ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी,बोनसमधे दरवर्षी १५०० रुपयांची वाढ तसेच LTA मधे २००० रुपयांची वाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
कामगारांना एक वर्षाची फरकाची रक्कम थकबाकी पोटी मिळणार आहे.
एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत असतांना स्थानिक कामगारांची नोकरी साबूत ठेवणे व त्यांना वाढणाऱ्या महागाई नुसार पगारवाढ करून देणे हा सध्याच्या परीस्थितीत संघटनेची महत्वाची जबाबदारी आहे असे कामगार नेते महेंद्र घरत या प्रसंगी सांगितले.
- हे देखील वाचा : Konkan Railway | कोकण रेल्वेची २ कोटी ५ लाख ५२ हजारांची दंडवसुली!
- Konkan Railway | कोकणातून धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्यांना माणगाव स्थानकावर प्रायोगिक थांबा
- जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा!
या करारनाम्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष -महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष -पि.के. रमण, सरचिटणीस- वैभव पाटील तर व्यवस्थापना तर्फे मर्स्कचे आय.आर.हेड योगेश ठाकूर,फ्युचर्झ स्टफिंगचे सि.ओ.ओ. चिराग जागड तसेच कामगार प्रतिनिधी दीपक पाटील, शरद तांडेल, जयवंत पाटील, नारायण पाटील उपस्थित होते.याप्रसंगी कामगारांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत व संघटनेचे आभार मानले. नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला झालेल्या पगारवाढीमुळे कामगारांमधे आनंदाचे वातावरण आहे.