रत्नागिरी : कोकण रेल्वे आपल्या मार्गावरुन धावणार्या प्रवासी गाड्यांमधून प्रवास करणार्या अनधिकृत प्रवाशांना रोखण्यासाठी सातत्याने तिकीट तपासणीची मोहीम राबवत आली आहे. या मोहिमेदरम्यान नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण 7,013 अनधिकृत, अनियमित प्रवासी तिकीट नसलेले प्रवासी आढळून आले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून एकूण 2 कोटी 5 लाख 52 हजार 446 रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सुत्रांकडून देण्यात आली.
नोव्हेंबरमध्ये 2023 मध्ये एकूण 7 हजार 13 प्रकरणांमध्ये कोकण रेल्वेने 2 कोटी 5 लाख 52 हजार 446 रुपये इतका दंड वसूल केला आहे. कोकण रेल्वे आपल्या प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे वेळोवेळी आवाहन करीत असते. प्रवाशांनी वैध तिकिटावर सन्मानाने प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]