मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ८ जानेवारीला रत्नागिरी दौऱ्यावर!

  • शिव संकल्प अभियानांतर्गत घेणार कार्यकर्ता मेळावा

रत्नागिरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभर शिव संकल्प अभियान अंतर्गत दौरे आयोजित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार ८ जानेवारी २०२४ रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दि. ६ जानेवारीपासून ३० जानेवारी २०२४ या कालावधीत हे दौरे आखण्यात आले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजाकीय पक्षांनी कंबर कसली आहे.यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभर दौरे आखण्यात आले आहेत. या दौऱ्यात त्या त्या मतदारसंघात कार्यकर्ते मेळावा घेतली जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात दिनांक ८ जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री शिंदे यांचा रत्नागिरी दौरा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता त्यांच्या उपस्थितीत शिव संकल्प अभियान अंतर्गत कार्यकर्त्यांच्या मेळावा घेतला जाणार आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या या महत्त्वपूर्ण दौऱ्या अंतर्गत होणाऱ्या मेळाव्याचे स्थळ अद्याप निश्चित व्हायचे आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE