लांजा : रत्नागिरी जिल्हा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या नासा, इस्रो परीक्षेत सुयश संपादन केलेल्या गुणवंत विध्यार्थी यांच्या हस्ते पंचायत समिती, ग्रामपंचायत ठिकाणीआज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले लांजा पंचायत समिती आवारात जावडे जिल्हा परिषद शाळा विध्यार्थी प्रणव कोलगे याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिरवली ग्रामपंचायत येथे सुमेद जाधव याच्या हस्ते तर वनगुळे येथे वनगुळे शाळा न 1ची कु गायत्री पराडकर हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

निर्मल ग्रामपंचायत शिरवली येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कु. सुमेद सचिन जाधव व कु. स्वाती सुनिल गोबरे यांच्याहस्ते करण्यात आले. गावच्या सरपंच सौ.तेजीता प्रसन्न राजापकर व उपसरपंच गोपीनाथ कुळये यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत नासा इस्त्रो भेट निवड चाचणी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरवलीच्या कु. सुमेद व कु. स्वाती या दोघांनाही ध्वजारोहणाचा बहुमान देत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करतानाच एक नवा आदर्श निर्माण केला.
या गुणवंत विध्यार्थ्यांचा ग्रामपंचायत वतीने सत्कार करण्यात आला या वेळी लांजा पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी योगेश कदम, सहाय्यक गट विकास अधिकारी संतोष म्हेत्रे, गट शिक्षणाधिकारी बंडगर विस्तार अधिकारी विनोद सावंग तसेच शिरवलीयेथे सरपंच ,ग्रामसेवक सर्व सदस्य शिक्षक तर वनगुळे येथे सरपंच प्रभाकर गुरव सर्व सदस्य आणि शिक्षक उपस्थित होते

