देवरूख (सुरेश सप्रे ) : महाराष्ट्र राज्य कॅरम असोशियनतर्फे दादर येथे घेणेत आलेल्या राज्य अजिक्यपद सब जुनियर कँरम स्पर्धेत साडवली येथील पी . एस. बने इंटरनॅशनल स्कूल चा इयत्ता ८वी चा विद्यार्थी द्रोण मोहन हजारे याची ‘वाराणसी’ येथे घेणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
द्रोण वडील मोहन हजारे यांच्यासह स्कूलचे सुपरवायझर कुंभार सर. P.T. शिक्षक अक्षय कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेबद्दल संस्थेचे सचिव सुभाष बने. संचालक रोहन बने. जिल्हा व तालुका कँरम असोशियनचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
