नव्या अटल सेतूवरून एसटीची शिवनेरी बससेवा सुरु
मुंबई : शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या ” अटल सेतू “वरून एसटीची शिवनेरी बस सेवा नुकतीच सुरू करण्यात आली आहे.
प्रायोगिक तत्त्वावर दि. २० फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन -मंत्रालय(सकाळी ६.३०) व स्वारगेट- दादर (७.००) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नव्या अटल सेतूवरून सुरू झालेल्या या बस सेवांमुळे प्रवाशांना अथांग समुद्राचं सौंदर्य टिपत शिवनेरी बसमधून प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.