सातारा : गाळाने भरलेला कोयना धरणाचा जलाशय लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. कोयना धरणातील गाळ उपशाचा प्रश्न मार्गी लागला असून नाम फाउंडेशन टाटा मोटर्सच्या मार्फत हे गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले आहे.

दरे (जि.सातारा) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोयना धरणातील गाळ काढण्याच्या शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत टाटा मोटर्स आणि नाम फाऊन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरण जलाशयातील गाळ काढण्यात येणार आहे.
यावेळी अभिनेते नाना पाटेकर, पालकमंत्री शंभूराज देसाई,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
- हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून
- Konkan Railway | खेड रेल्वे स्थानकातून लवकरच होणार कंटेनर वाहतूक
- मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
