रत्नागिरी, दि. १ : येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, तहसिलदार राजाराम म्हात्रे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
