यात्रेनिमित्त शुभांगीताई घरत यांनी शांतादेवीला केले सोन्याचे मंगळसूत्र अर्पण!

उरण दि. २ (विठ्ठल ममताबादे )सालाबादप्रमाणे गव्हाण, कोपर, शेलघर, शिवाजीनगर गावातील यात्रोत्सवाला गुरुवार दि.२ मे २०२४ रोजी देवीच्या पूजाअर्चेने भल्या पहाटे सुरुवात झाली. संपत्ती किती कमावली यापेक्षा संपत्ती किती गरजुना कामी आली याला महत्व देणाऱ्या, यमुना सामाजिक -शैक्षणिक संस्थेच्या सरचिटणीस,सामाजिक कार्य आणि परोपकारी कार्यासाठी सदैव अग्रेसर असणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या अर्धांगिनी शुभांगीताई घरत यांनी तब्बल १४ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र देवीच्या चरणी अर्पण केले.


शेकडो वर्षांची परंपरा शांतादेवी यात्रेला आहे,अनेक वर्ष जहागीरापासून पूर्वापार दागिने शांतादेवी साठी वापरले जात आहेत. धार्मिक वृत्तीच्या शुभांगीताईनीं पि.एन.जि. ज्वेलर्सच्या माध्यमातून एक सुंदर डिझाईनचे मंगळसूत्र शांतादेवीसाठी घडविले व आज त्याचे अर्पण शुभांगीताई घरत यांच्या हस्ते यात्रेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले.


मागच्याच महिन्यात शुभांगीताई घरत यांनी आपल्या उत्पन्नातील काही भाग अर्थसहाय्य म्हणून त्या ज्या दापोली माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत त्या न्यू इंग्लिश स्कूल दापोली पारगाव विद्यालयाला तब्बल पंचवीस लाख रुपयांची देणगी दिली आहे. आपले दानशूर सासरे स्वर्गीय तुकाराम बुवा घरत ज्यांनी सन १९६५ साली श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय गव्हाण शाळेच्या उभारणीसाठी भरीव आर्थिक मदत केली होती.

शुभांगीताई यांचे पती महेंद्रशेठ घरत ज्यांचे सर्व क्षेत्रातील दानशूरते बाबत आदर्श नाव घेतले जाते त्यांचा दानशूरतेचा वारसा पुढे नेण्याचे काम शुभांगीताई घरत करत आहेत.त्यांच्या समवेत घरत परिवारातील महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE