
- मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडून गौरव
पाली (रत्नागिरी ) : भोपाळ येथे सुरू असलेल्या ६७ व्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत लांजा तालुक्यातील पुनस येथील मैत्रेयी मनोज साळवी हिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक मिळवले आहे.

५० मीटर नेमबाजी स्पर्धेत मैत्रेयी हिने मिळवलेल्या यशाबद्दल जिल्हाभरातून तिचे कौतुक होत असतानाच राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या पाली निवासस्थानी शाल व श्रीफळ देऊन तिचा सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
