आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदी आयोजित विद्यार्थ्यांच्या मूल्यसंवर्धनासाठी “ओळख श्री ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा” या पुस्तक प्रकाशन सोहळा मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी डॉ. उदय सामंत म्हणाले की, हा कार्यक्रम माझ्या दृष्टीने फार मोठा कार्यक्रम असून आपण ज्या ग्रंथाच प्रकाशन करतो ते ग्रंथ खूप ताकतीचे ग्रंथ आहेत आणि त्याच प्रकाशन मी करतोय हे माझं परमभाग्य आहे आणि याच मला समाधान आहे अशी भावना यावेळी व्यक्त केली.
खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती पाहायची असेल तर संतांच्या भूमीत आलं पाहिजे. माझ्या आयुष्याच्या दृष्टीने संत ज्ञानेश्वरांच्या भूमीतील कार्यक्रम अतिशय भाग्याचा क्षण आहे. हे पुस्तकं प्रकाशन करताना पुस्तकं वाचली पाहिजेत, संत साहित्य म्हणजे अभिजात भाषा आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांची भाषा ही फक्त अभिजात भाषा नाही तर जगातील सर्व भाषांना मागे टाकणारी भाषा आहे असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
