मुंबई : मध्ये घाटकोपर भागात बापानेच पोटच्या पोरीचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिसरं मूल नको म्हणून बापानेच आपल्या अवघ्या चार महिन्याच्या मुलीचा जीव घेतला आहे. पाळण्याच्या दोरीनेच चिमुकलीच्या गळ्याला फास आवळला आणि तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सध्या पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. ही घटना घाटकोपरच्या कामराज नगरमधील आहे.
मृत मुलीची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. तेव्हा बापाने वेळ साधून आपल्या चार महिन्याच्या मुलीचा जीव घेतला. संजय कोकरे असं आरोपी बापाचं नाव होतं. मुलगी नको आणि तिसरं बाळ नको म्हणून आरोपीने तिचा स्वतःच्याच हाताने जीव घेतला. आई घरात आल्यानंतर बाळ निपचित पडल्याचं पाहून ती घाबरली. आपलं बाळ गेल्याचा मोठा धक्का आईला बसला आहे.
ही घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी आहे. समाजात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि जनजागृतीसाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे.
