पोस्ट विभागाकडून रत्नागिरीत आधार नोंदणी व अद्ययतन शिबीराचे आयोजन
रत्नागिरी : पोस्टल विभागाकडून जिल्ह्यातील नागरिकांसाठी विविध ठिकाणी आधार नोंदणी व
अद्ययतन शिबिरांचे आयोजन करणायात आले आहे. जून महिन्यात एकूण 10 ठिकाणी या शिबिरांचे आयोजन
करण्यात येणार असून आजअखेर झालेल्या पाच ठिकाणांच्या शिबिरात 250 पेक्षा अधिक नागरिकांनी आधार
नोंदणी करून अद्ययतन सुविधेचा लाभ घेतला आहे.
24 जून रोजी देवरुख तालुक्यातील देवधे व सायले आणि 28 जून रोजी रत्नागिरी तालुक्यातील पाली
येथे शिबीर आयोजित केले जाणार आहे. या शिबिरात आधार धारकांचे हाताचे ठसे अपडेट करणे, फोटो,
जन्मतारीख, ई-मेल, नाव, पत्ता बदलणे इत्यादी सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच लहान
मुलांचेही आधार देखील विनामूल्य काढता येईल.
शिबिरात इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेकडून डिजिटल खाते उघडणे, मोबाईलला आधार व ई-मेल आयडी
लिंक करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. या शिबिरांचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त
नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अधीक्षक डाकघर रत्नागिरी एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.