- शेकापचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्त्यांचा भाजपात महाप्रवेश
- भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, नामदार आशिष शेलार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले स्वागत
उरण दि ११ (विठ्ठल ममताबादे ) : शेकापचे ज्येष्ठ व हेवीवेट नेते तसेच पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत पनवेल, उरण, खालापूरसह रायगडमध्ये राजकीय भूकंप केला. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला. पक्षप्रवेशाची भली मोठी रांग यावेळी लागली त्यामुळे रायगडमध्ये राजकीय भूकंप होत शेकापला मोठा हादरा बसला आहे.
उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

शेकापचे ज्येष्ठ व हेवीवेट नेते तसेच पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासोबत शेकापचे जिल्हा चिटणीस माजी नगरसेवक गणेश कडू, उपाध्यक्ष रवीशेठ पाटील, वहाळचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते पांडुमामा घरत, ज्येष्ठ नेते हरचंदसिंग सग्गू, ज्येष्ठ नेते रघुशेठ घरत, मनुशेठ कांडपिळे, तालुका सहचिटणीस जितेंद्र म्हात्रे, पुरोगामी युवक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, लाल ब्रिगेड तालुकाध्यक्ष रमाकांत पाटील, प्रकाश जितेकर, माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ, माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर, प्रिती जॉर्ज म्हात्रे, अरुणा दाभणे, सारिका भगत, पुष्पलता मढवी, श्वेता बहिरा, कुसुम पाटील, रेणुका मोहोकर, प्रार्थना वाघे, मंजुळा कातकरी, माजी नगरसेवक रवींद्र भगत, सुनिल बहिरा, गणेश पाटील, डी. पी. म्हात्रे, आकाश ठोकळ,माजी जिल्हा परिषद सदस्य राजुशेठ पाटील, जीवन म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्या पार्वती पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती निशा लक्ष्मण ठाकूर, माजी उपसभापती जगदीश पवार, सीमा घरत, भात गिरणी सहकारी संस्था उपसभापती राजेंद्र घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, वहाळचे माजी सरपंच बाळाराम पाटील, अरुण दापोलकर, सुनील पाटील, गणेश पाटील, गव्हाणच्या माजी सरपंच माया भोईर, सचिन घरत, एल.एल. पाटील, कोळखे ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनल म्हात्रे, उषा अजित अडसुळे, कर्नाळा माजी सरपंच सुषमा पाटील, मानघर सरपंच राजेंद्र पाटील, वावेघर सरपंच गीतांजली गाताडे, तुराडे सरपंच रिया माळी, गुळसुंदे उपसरपंच अरुणा पाटील, माजी सरपंच आर. डी. पाटील, गुरुनाथ माळी, सदस्या काव्या जोशी, दीपाली जगताप, अभिजित पाटील, यांच्यासह शेकापच्या हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच काँगेस, शिवसेना (ठाकरे गट), मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
