मुंबई (सुरेश सप्रे) : कट्टर कुणबी हिंदू संस्कृती रक्षक सेना यांच्यावतीने रविवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी शिरोडकर हायस्कूल, परळ, मुंबई येथे संस्थापक अध्यक्ष प्रदीप मोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ५ ते ९ या वेळेत जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
कोकणातील ६०ते६५% कुणबी-ओबीसीच्या मतांवर निवडून येवून नंतर कुणबी समाजाला वारेवर सोडून आपली राजकीय पोळी भाजणारे कोकणातील बिगर कुणबी आमदार, खासदारांना निवडून न देता आपल्याच बांधवांना बळ देवू सशक्त बनवण्याच्या विचाराने प्रेरित होऊन
‘शेतकरी राजा जागा हो ! शासन दरबारी कुणबी बांधवा आता विकासाचा धागा हो ‘, असा घोष देत आपली एकजूटीची वज्रमुठ बांधण्यासाठी कट्टर कुणबी हिंदू संस्कृती रक्षक सेना यांच्यावतीने रविवारी (दि. ६ नोव्हेंबर) रोजी शिरोडकर हायस्कूल, परळ, मुंबई येथे संस्थापक अध्यक्ष प्रदीप मोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ५ ते ९ या वेळेत जाहीर मेळावा सपंन्न होणार आहे.
जाहीर मेळाव्यात प्रामुख्याने खोटा इतिहास पसरविणाऱ्यांचे विरोधात, आपले आईवडील व पूर्वजांनी सुसंस्कृती जपलेल्या कोकणी परंपरा पुढील पिढी समोर ठेवून आदर्श व परंपरा कायम ठेवण्यासाठी तसेच वैद्यकीय, शैक्षणिक, व्यवसायिक आणि सामाजिक कार्याचा पाया भक्कम करणे. अशा अनेक विषयांवर या मेळाव्यात चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.
रत्नागिरी जिल्हा सह कोकणातील कुणबी बांधवानी मुंबई येथे होणाऱ्या मेळाव्याला बहुसंख्येंने उपस्थित राहावे असे आवाहन कट्टर कुणबी हिंदू संस्कृती रक्षक सेनेचे उपाध्यक्ष नंदकुमार बेंद्रे यांनी केले आहे.
