कट्टर कुणबी हिंदू संस्कृती रक्षक सेनेतर्फे मुंबईत ६ नोव्हेंबरला जाहीर मेळावा

मुंबई (सुरेश सप्रे) : कट्टर कुणबी हिंदू संस्कृती रक्षक सेना यांच्यावतीने रविवारी दि. ६ नोव्हेंबर रोजी शिरोडकर हायस्कूल, परळ, मुंबई येथे संस्थापक अध्यक्ष प्रदीप मोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ५ ते ९ या वेळेत जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

कोकणातील ६०ते६५% कुणबी-ओबीसीच्या मतांवर निवडून येवून नंतर कुणबी समाजाला वारेवर सोडून आपली राजकीय पोळी भाजणारे कोकणातील बिगर कुणबी आमदार, खासदारांना निवडून न देता आपल्याच बांधवांना बळ देवू सशक्त बनवण्याच्या विचाराने प्रेरित होऊन
शेतकरी राजा जागा हो ! शासन दरबारी कुणबी बांधवा आता विकासाचा धागा हो ‘, असा घोष देत आपली एकजूटीची वज्रमुठ बांधण्यासाठी कट्टर कुणबी हिंदू संस्कृती रक्षक सेना यांच्यावतीने रविवारी (दि. ६ नोव्हेंबर) रोजी शिरोडकर हायस्कूल, परळ, मुंबई येथे संस्थापक अध्यक्ष प्रदीप मोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ५ ते ९ या वेळेत जाहीर मेळावा सपंन्न होणार आहे.

जाहीर मेळाव्यात प्रामुख्याने खोटा इतिहास पसरविणाऱ्यांचे विरोधात, आपले आईवडील व पूर्वजांनी सुसंस्कृती जपलेल्या कोकणी परंपरा पुढील पिढी समोर ठेवून आदर्श व परंपरा कायम ठेवण्यासाठी तसेच वैद्यकीय, शैक्षणिक, व्यवसायिक आणि सामाजिक कार्याचा पाया भक्कम करणे. अशा अनेक विषयांवर या मेळाव्यात चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.

रत्नागिरी जिल्हा सह कोकणातील कुणबी बांधवानी मुंबई येथे होणाऱ्या मेळाव्याला बहुसंख्येंने उपस्थित राहावे असे आवाहन कट्टर कुणबी हिंदू संस्कृती रक्षक सेनेचे उपाध्यक्ष नंदकुमार बेंद्रे यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE