रत्नागिरीत नेत्रदीपक शोभायात्रेने हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत!

रत्नागिरी : विविध संस्था संघटना तसेच देवस्थानांच्या चित्ररथांनी युक्त शोभायात्रा काढून बुधवारी सकाळी गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षाचे रत्नागिरीत अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. सामाजिक संदेश देणाऱ्या विविध चित्ररथांनी यावेळी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

ढोल ताशांच्या गजरात मारुती मंदिर येथून सुरू झालेली ही ही नववर्ष स्वागत यात्रा रस्त्याच्या एका मार्गिकेने शिस्तबद्धपणे शहराच्या दिशेने पुढे सरकत होती. या शोभायात्रेत हजारो नागरिक भगवे फेटे परिधान करून सहभागी झाले होते. शोभायात्रेदरम्यान शिस्तबद्धता राखली जावी तसेच वाहतुकीचे नियमन व्हावे, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी रत्नागिरीतील नववर्ष स्वागत यात्रा नागरिकांना ऑनलाइन कुठूनही पाहता यावी, यासाठी रत्नागिरी येथील प्रेस फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांनी आपल्या यूट्यूब चैनलवर शोभायात्रेचे लाईव्ह प्रक्षेपण केले. नागरिकांना मालगुंडकर यांच्या या उपक्रमामुळे यावेळी प्रथमच गुढीपाडव्याला रत्नागिरीत काढण्यात आलेली शोभायात्रा युट्युबवर लाईव्ह पाहता आली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE