रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगाराकडून चालवण्यात येणारी ९.३० ची जयगड सैतवडे तसेच खंडाळा -वडवली या एसटी बस फेरीसाठी नवीन मार्ग फलक भेट स्वरुपात देण्यात आला.
एसटीचे खंडाळा येथील वाहतूक नियंत्रक श्री. चव्हाण यांच्याकडे हे फलक सुपूर्द करण्यात आले. या वेळी कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य सोहम बापट आणी, रत्नागिरी आगाराचे चालक वाहक उपस्थित होते. बसे फेऱ्यांचा या मार्गावरील प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण एसटी प्रेमी ग्रुपकडून करण्यात आले आहे.
















