महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्त शानदार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
मुंबई : महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सन -२०२३ च्या वार्षिक महाअधिवेशनाच्या निमित्ताने शानदार पुरस्कार वितरण सोहोळ्यासाठी पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये नवरत्न पुरस्कार, आदर्श माता,आदर्श पिता, आदर्श माता- पिता पुरस्कारही देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, शैक्षणिक, सरपंच, राजकीय, प्रशासकीय, उद्योग, युवा, शेती, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येणार आहे.
दि.१५ एप्रिल २०२३ पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कार माहिती पीडीएफ स्वरुपातही पाठवता येणार आहे. पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास 9422420611 या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव,पत्ता, हुद्दा कळवावा. अधिक माहितीसाठी याच फोनवर (सायंकाळी 5 ते 7) संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यअध्यक्ष – विलासराव कोळेकर राज्य उपाध्यक्ष-सागर पाटील, राज्य उपाध्यक्ष-श्री सोमनाथ पाटील यांनी केले आहे















