स्पोर्ट फिशिंग असोसिएशन महाराष्ट्रचा उपक्रम
गुहागर : येथील समुद्रकिनारी प्रथमच स्पोर्ट फिशिंग असोसिएशन महाराष्ट्र सर्फ फिशिंग टुर्नामेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धा १५ एप्रिलला गुहागर समुद्र किनाऱ्यावर होणार आहे.
या वेळी पालकमंत्री उदय सामंत, प्रांतांधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार प्रतिभा वराळे, पोलिस उपअधीक्षक डॉ. सचिन बारी, पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते, हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे किशोर धारिया, अभिनेते मनोज जोशी, नगराध्यक्ष राजेश बेंडल आदी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ६ वाजता, तर बक्षीस वितरण सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
सर्फ मासेमारी काय आहे
सर्फ मासेमारी किनाऱ्यावर उभे राहून मासे पकडण्याचा किवा सर्फमध्ये विहार करण्याचा खेळ आहे. सर्फ फिशिंग ही एक सामान्य संज्ञा आहे. त्यात आमिष किवा आमिष टाकणे समाविष्ट असू शकते किवा नसू शकते. सर्व प्रकारच्या किनाऱ्यावरील मासेमारीचा संदर्भ देते. वालुकामय आणि खडकाळ किनारे, रॉक जेटी किवा अगदी मासेमारीच्या घाटांपासून अटी सर्फ कास्टिंग किवा बीच कास्टिंग किनाऱ्यावर किंवा त्याच्याजवळ सर्फमध्ये टाकून समुद्र किनाऱ्यावरून सर्फ करण्यासाठी विशेषतः खारट पाण्यामध्ये सर्फ मासेमारी केली जाते.

या कार्यक्रमाचे संस्थेतील कार्यकारणी व सदस्यपदी अध्यक्ष संतोष कोळवणकर, उपाध्यक्ष आशुतोष शेलार, खजिनदार मयूर झिंगे, सदस्यपदी संदीप दर्णे, मंदार सुर्वे, मंगेश माने, अवधूत वेल्हाळ, संतोष सावंत, अविनाश वेलिंगकर, पराग कोळी, सूरज भाटकर, अरुणभा संनिग्रही यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.














