लांजा : लांजा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष सौ. पूर्वा मुळे यांच्यावर दहाजणांच्या शिवसेना शिंदे गट गटाने अविश्वास ठराव दाखल केला असून सोमवारी 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, पूर्वा मुळे यानी 15 सदस्यांना व्हीप बजावल्याने लांजातील राजकारण तापले आहे. या अविश्वास ठराव च्या घडामोडी वर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे सदस्य सुरक्षित ठिकाणी गेले आहेत.
शिंदे गटाकडे 10 सदस्य यांच्याकडे बहूमत असल्याने हा ठराव संमत होणार का याकडे लक्ष वेधले आहे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्या नंतर राज्यातील शिवसेनेचे दोन गट तयार होऊन स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ही या बंडाचे थेट परिणाम झाले लांजा नगर पंचायतमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 15 सदस्य सह गटनेते पद हे पूर्वा मुळे यांच्या कडे आहे त्या सध्या उप नगराध्यक्ष आहेत नगराध्यक्ष मनोहर बाईत याच्या सह 10 जणांनी भाजपचे दोन सदस्य घेऊन वेगळा गट तयार केला आहे.

या गटाचे गट नेते पद सचिन डोंगरकर यांना नेमले होते यावर ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. मात्र ही याचिका वर कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. वा कोणतेही स्थगिती नाही पूर्वा मुळे यांच्यावर कारवाई याबाबत आता शिंदे गटाने पूर्वा मुळे यांच्या वर अविश्वास ठरावा चे पाऊल उचलले आहे शिंदे गटाकडे आतां भाजप चे दोन सदस्य आणि 08 सदस्य मिळून 10 जण सह बहुमत आहे. शिंदे गटाचे डोंगरकर यांना नियमानुसार व्हीप बजावण्यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत गॅझेट वर अजूनही पूर्वा मुळे ह्या गट नेत्या म्हणून नगरपंचायत मध्ये नोंद आहे ही बाब ठाकरे गटाला दिलासा देणारी आहे तर शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे.
सोमवारी तातडीने हा अविश्वास ठराव दाखल झाला आहे. त्यामुळे लांजा शहरातील राजकारण तापले आहे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी, संदीप दळवी जगदीश राजापकर यांनी ठाण मांडले आहे. तर दुसरीकडे सामंत गट ,राणे सह बडे नेते या लांजातील नगर पंचायत हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. उपनगराध्यक्ष साठी भाजपचे संजय यादव,मंगेश लांजेकर आणि शिंदे गटाचे सचिन डोंगरकर हे दावेदार आहेत. दोन अपक्ष आणि काँग्रेस दोन सदस्य हे पूर्वीच्या 15 जणांच्या गटात आहेत. पूर्वा मुळे यांचा व्हिप हा टर्निंग पॉईंट ठरणार आहे
