
अलिबाग : जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर ता.माणगाव येथे इयत्ता सहावी वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी आयोजित करण्यात आलेली जवाहर नवोदय निवड चाचणी परीक्षा शनिवार, दि.29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या वेळेत होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र https://cbseitms.rcil.gov.in/nvs/, या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी लवकरात लवकर आपले प्रवेश पत्र https://cbseitms.rcil.gov.in/nvs/ या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावेत, असे आवाहन प्राचार्य, के.वाय.इंगळे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी श्री.संतोष आर. चिंचकर, मो.9881351601, श्री.सतीश जमदाडे, मो.9890343452/9284669382, श्री.केदार र. केंद्रेकर, मो.9423113276/7038215346 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
