देवरूख (सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यातील देवरूख गेल्येवाडी येथे संपन्न झालेल्या पहिल्याच प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बाळा कामेरकर आणि बंड्या बोरुकर यांच्या सोळजाई भैरव संघाने विजेतेपद पटकाविले तर उपविजेतेपड -अक्षय झेपले यांच्या जय भैरीसंघाने
पटकावले.
या स्पर्धेत तालुक्यातील सर्व कबड्डी खेळाडूनमधून ६ संघ निवडले गेले होते.
स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक चषक आणि रोख बक्षिस देण्यात आले तर उत्कृष्ठ चढाई, उत्कृष्ट पकड, आणि संपूर्ण स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट खेळाडू यांना हि वैयक्तिक पारितोषिक देवून गौरविणेत आले.
पाहिला सेमी फायनलचा सामना गणेश मोहिते आणि महेश पवार यांचा संघ नीलकंठेश्वर वॉरियर्स आणि अक्षय झेपले यांचा जय भैरी यांच्या झाला त्यात जयभैरी ने भाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली. दुसरा सेमि फायनल सामना सचिन मांगले यांच्या गुणिता सॅप्लायर्स आणि बाळा कामेरकर आणि बंड्या बोरुकर यांच्या सोळजाई भैरव या संघात झाला. या चुरशीच्या लढतीत सोळजाई भैरव ने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला,
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नगर सेवक वैभव पवार. सौ. रेश्मा किर्वे. सामाजिक कार्यकर्ते तुकाराम किर्वे , राजा गुरव , मंडळाचे अध्यक्ष अनिल गेल्ये, प्रकाश पारवडेकर, यांचे उपस्थित संपन्न झाला तर बक्षीस समारंभ – नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये . माजी उप नगराध्यक्ष अभी शेट्ये. माजी जिप अध्यक्ष रोहन बने यांचे उपस्थित फार पडला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी व गेल्येवाडी मंडळाचे सदस्यांनी मेहनत घेतली..
