लांजा पोलिसांनी गांजा सेवन करणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

लांजावासीयांच्या दणक्यानंतर अखेर लांजा पोलिसांची धडक कारवाई

लांजा : शहरातील नागरीकांनी अमली पदार्थ च्या वेसनात अडकलेल्या तरुण पिढीच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक मोहीमेमुळे लांजा पोलीस सरसावले असून काल रात्री धडक कारवाई करण्यात आली आहे. आज शनिवारी सायंकाळी गाव कमिटीच्या पुढाकाराने शहरवासीयांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अमली पदार्थ विक्री आणि रॅकेट याबाबत जोरदार चर्चा झाली

शुक्रवारी लांजा शहरात रात्री करण्यात आली. या कारवाई
कारवाईज २६.०९ ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. गांजासारख्या अमली पदार्थाची सेवन आणि विक्री करणाऱ्या विरोधात लांजा पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली असून शुक्रवारी १२ मे रोजी रात्री लांजा शहरातील चिंतामणी हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या मोकळ्या जागेत गांजाचे सेवन करणाऱ्या चौघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. यामध्ये २६.०९ ग्रॅम वजनाचा गांजा देखील पोलिसांनी जप्त केला असून या कारवाईचे शहरातील नागरिकांतून स्वागत केले जात आहे.


लांजा शहरात गेल्या काही दिवसांपासून गांजासारख्या अमली पदार्थांचे सेवन, विक्री करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी १२ मे रोजी रात्री ७.५० वाजता चिंतामणी हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या चिरेबंदी कंपाउंड असलेल्या मोकळ्या जागेत काहीजण गांजा ओढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांच्या त्या ठिकाणी धाड टाकून चौघा जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत २६.०९ ग्रॅम वजनाच्या ४२० रुपये किमतीचा अमली पदार्थ गांजा हा देखील जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एमाननुरी मोहम्मद वकील अजीजी उर्फ मौलू (२२वर्षे राहणार वैभव वसाहत, मुळगाव औरंगाबाद बगवली जिल्हा संत कबीर नगर, उत्तर प्रदेश), प्रमोद यशवंत गुरव( ३९, देवधे गुरववाडी ता. लांजा), विनायक प्रकाश कुरूप (२८ रा. लांजा कुरूपवाडी )आणि उमेश सुभाष गांगण ( व ४२ वर्षे राहणार भांबेड गांगणवाडी तां. लांजा या चौघा तरुणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. हे चौघेजण एकमेकांच्या संगनमताने गांजासारख्या अमली पदार्थ चिलीममध्ये भरून सेवन करताना आढळून आले आहेत.

नायब तहसीलदार सौ. उज्वला केळुस्कर, पोलीस निरीक्षक दादा साहेब घुटकडे यांच्यासमवेत लांजा गाव कमिटी आणि गावकरी यांची तहसील दालनात बैठक झाली. यावेळी सर्व ,प्रमुख मानकरी आणि नागरिक उपस्थित होते. अंमली पदार्थ रॅकेट बाबत जोरदार चर्चा झाली पोलीसांनी कठोर कारवाई करण्याचे अभिवचन दिले. काल एक शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन अंमली पदार्थ विक्री बाबत निवेदन दिले होते.


गांजासारख्या अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या या चौघाही व्यक्तींवर लांजा पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. ॲक्ट १९८५ चे कलम ८ (क) ,२७ सह २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे करत आहेत

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE