जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती
रत्नागिरी :- राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या सोमवारी म्हणजेच दि. 5 जून रोजी सकाळी 9 वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, तर दुपारी 1 वाजता संकल्प सिध्दी सभागृह (पोलीस विभाग) साटवली रोड, ता. लांजा जि. रत्नागिरी येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.















