मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शुक्रवार १४ जुलै २०२३ रोजी मुंबई-गोवा महामार्ग (पनवेल ते रत्नागिरी) पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी नॅशनल हायवे ऑथोरिटी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी हा पाहणी दौरा सकाळी ७.४५ वा. पनवेल रेस्ट हाऊस येथून सुरु होणार असल्याची माहिती बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे माध्यम समन्वयक गोविंद येतयेकर यांनी दिली आहे.
