साफसफाईसाठी ग्रामस्थांनीच घेतला पुढाकार
संगमेश्वर : कडवई – कुंभारखाणी रस्त्याकडे बांधकाम खाते यांचे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावर पूर्ण झाडी झूडपे आल्याने रस्ता वाहतूक बंद झाली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या बैठकीनंतर जेसीबीच्या मदतीने रस्त्याची साफसफाई करून हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य बनवण्यात आला.

या रस्त्यावरील दुरवस्थे संदर्भात दि. 5 जुलै 2023 रोजी ग्रामपंचायत कुंभारखाणी व राई कोंड मधलीवाडी यांची संयुक्त सभा जय भवानी समाजमंदिर मधलीवाडी येथे घेण्यात आली होती. यासभेमध्ये सौ. राजश्री कदम यांनी रस्त्यांची सफाई होणे गरजेचे आहे व हे रस्ते ग्रामपंचायतीने साफ सफाई करून घ्यावेत, असे आपले मत मांडले. याकरिता श्री. विकास सर सुर्वे, संतोष दीपाजी सुर्वे, श्री संजय साळवी, श्री राजेंद्र कदम, श्री. रवींद्र सखाराम सुर्वे यानि चर्चेत या विषयाला विशेष पाठिंबा दिला. या वर चर्चा झाल्या नंतर असे ठरविण्यात आले की, जे व्यापारी गावात जंगल तोड करतात त्यांनी राई कोंड, मधलीवाडीचे दोन्ही रस्ते सफाई करून घ्यावेत. त्याप्रमाणे श्री प्रतीक सुर्वे, श्री विकास सुर्वे, श्री राजेंद्र कदम व रवींद्र सखाराम सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 जुलै रोजी नदीकडे जाणारे दोन्ही रस्ते जेसीबीच्या साहाय्याने सफाई करून घेण्यात आले.

यासाठी प्रतीक सुर्वे, दिलीप सुर्वे (बाबू) बापू टाकले, शशिकांत सुर्वे, पांडू निर्मल यांचे सहकार्य लाभले. तसेच विशेषतः प्रतीक सुर्वे यांनी पूर्ण दिवस जेसीबीसोबत उपस्तीत राहून हे काम पूर्ण करून घेतले सर्व ग्रामस्थ कोंड राई व मधलीवाडी तर्फे सर्वांचे आभार मानले तर शासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने खेद व्यक्त करण्यात आला. या व इतर समस्याची निवेदने आमदार शेखर निकम तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना विकास सुर्वे यांनी दिली आहेत.
