संगमेश्वर दि. १५ ( प्रतिनिधी ) : फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत रयत शिक्षण संस्था संचलित शिरगाव विद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांपैकी ६ विदयार्थी उत्तीर्ण होऊन त्यातील रजत प्रतापराव महिते हा चिपळूण तालुक्यात ५ वा तर समाधान बाजीराव वीरकर हा तालुक्यात ८ वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक , मार्गदर्शक शिक्षक, पालक, स्कूल कमिटी आणि शिरगाव ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
