माजी आमदार, जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांचा शिक्षणासाठी मदतीचा हात

उरण (विठ्ठल ममताबादे ) : शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख, माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्य सर्वानाच माहीत आहे. त्याचा आणखीन एक प्रत्यय पहायला मिळाला.
उरण मतदार संघातील उरण तालुक्यातील चिरनेर येथील गरीब व गरजू विद्यार्थिनी कु. सायली वीरेंद्र सारंग हे वीर वाजेकर कॉलेज, फुंडे येथे एफ वाय बी ए या वर्गात शिकत आहे व कु.परी रवींद्र चिर्लेकर ही विद्यार्थिनी रोटरी क्लब एज्युकेशन कॉलेज, उरण येथे अकरावीला शिकत आहे त्यांच्या घरची अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यांची शिक्षणासाठी फी ची व्यवस्था होत नव्हती. अशा वेळी गरीब व गरजूंच्या मदतीला नेहमीच धावून येणारे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी या विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी
मदतीचा हात पुढे केलेला आहे,  त्यांची फी रोख रकमेच्या स्वरूपात त्यांच्या व त्यांच्या आईकडे सुपूर्द केली.  त्यांच्या अनमोल कार्याबद्दल सर्व स्तरावरून नेहमीच माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांचे कौतुक होत असते.सामाजिक बांधिलकी जपणारा नेता अशी त्यांची  समाजामध्ये कायमस्वरूपी ओळख निर्माण झाली आहे.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE